डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक 2024 जिंकल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा अमेरिकन प्रेसिडेंट म्हणुन दुसरा कार्यकाळ असणार आहे. याआधी 2016 साली अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ते डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून 45 वे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान मिळवला होता. त्यांनी जागतिक राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला आहे. ते एक यशस्वी व्यावसायिक आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रसिध्द आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी न्यूयॉर्क येथे झाला, त्यांचे सुरवातीचे शिक्षण फोर्डहॅम युनिव्हर्सिटी मधून झाले. पुढे त्यांनी व्हार्टन स्कूल ऑफ फायनान्स मधून पदवी घेतली. त्यांचे वडील बांधकाम व्यावसायिक होते, शिक्षण पूर्ण केल्यावर डोनाल्ड ट्रम्प हे वडलांसोबत रिअलइस्टेट मध्ये काम करू लागले. त्यांनी तो व्यवसाय अधिक यशस्वी बनवून दाखवला.
अमेरिकन राष्ट्रअध्यक्षीय निवडणूक 2024
अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक 2024 मधे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 47 वे राष्ट्राध्यक्ष पदी विजय मिळवला आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी 538 पैकी 270 एलेक्टराल मते मिळवणे आवश्यक असते. डोनाल्ड ट्रम्प यांना एकुण 295 इलेक्टराल मते मिळाली आहेत. तर कमला हॅरिस यांना 226 इलेक्टराल इतकी मते मिळाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. ते रिपब्लिकन पक्षाकडून लढत होते, ते पेशानी उद्योजक आहेत आणि दूरचित्रवाणी चे अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. तर दुसरीकडे कमला हॅरिस या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या वतीने लढत होत्या, त्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचा जाहीरनामा ‘Agenda 47’
डोनाल्ड ट्रम्प यांनी “मेक अमेरिका ग्रेट अगैन” हा नारा दिला होता. या घोषणेतून अमेरिकेला पुन्हा एकदा विकास, प्रतिष्ठा आणि प्रभाव मिळवून देण्याचे वचन त्यांनी दिले होते. या घोषवाक्यातून त्यांनी बऱ्याच अमेरिकन नागरिकांना आकर्षित केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीत Agenda 47 अंतर्गत जाहीरनामा सादर केला. त्याचा उद्देश अमेरिकेला पुन्हा एकदा जागतिक महाशक्ती महत्त्व मिळवून देण्याचे आहे. यामध्ये प्रामुख्याने
- सीमारेषा सौरक्षण / घुसखोरी थांबवणे
- आर्थिक स्थिरता
- ऊर्जा धोरण
- लष्करी मजबुतीकरण
- शिक्षण आणि महिला सशक्तीकरण
- संस्कृती संरक्षण
- आधुनिकीकरण
- न्यायप्रणाली सुधारणा
- परराष्ट्र धोरण
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातील धोरणांना अधिक तीव्र करणार असल्याचेही सांगीतले आहे. पहिल्या राष्ट्रअधक्ष्य कार्यकाळात त्यांनी आर्थिक विकासाला चालना दिली, बेरोजगारी कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न केले आणि व्यापार करारामध्ये बदल केले. ते इमीग्रेशन आणि कोरोना काळातील आरोग्यसेवा, पर्यावरण अशा काही धोरणामुळे ते वादात अडकले. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे कायम चर्चेत राहिले आहेत, त्यांची ट्विटरवरील सक्रियता नेहमीच प्रकाशझोतात असते. त्यांच्या वातव्यामुळे समर्थन आणि विरोधही त्यांना सहन करावा लागला.
डोनाल्ड ट्रम्प हे एक प्रभावशाली आणि वादग्रस्त नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा प्रभाव अमेरिकेसोबत जागतिक पातळीवर देखील दिसून येतो. त्यांच्या पहिल्या कर्यकाळात मोठे निर्णय घेतले गेले आहेत. त्यांनी राजकारण आणि नेतृत्वाला एक वेगळी दिशा दिली आहे.
हे वाचले का….?
सोनं (gold) खरेदी करताना काय काळजी घ्याल…? | Sone kharedi kartana kay kalgi ghyal…?
प्रकाश आंबेडकर हॉस्पिटल मधे भरती | Prakash Ambedkar hospital madhe bharti