Royal Enfield| रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक ३५० बॉबर मार्केट मध्ये दाखल.

Royal Enfield Goan 350 bobber
Royal Enfield classic 350 Goan bobber

Royal Enfield कंपनीने आपल्या रॉयल फॅमिली मध्ये रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक 350 बॉबर ही नवी बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक क्लासिक 350 वर आधारित त्यांची पहिली बॉबर बाईक आहे. या बाईकचा लुक अतिशय आकर्षक आणि पावरफुल आहे. काही दिवसांमध्ये ती आपल्याला रस्त्यावर आपल्या खासियत सोबत पळताना दिसणार आहे. अतिशय स्टाईलीश दिसणारी ही बाईक, बाईकलवर लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

डिझाईन आणि लूक

गोअन क्लासिक 350 बॉबर चा लुक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चा लूकवर आधारित आहे. त्याचे फ्युएल टॅंक, हेडलाईट, इंजिन आणि साईड पॅनल हे क्लासिक 350 प्रमाणेच आहेत. Royal Enfield Goan Classic 350 bobber ही बऱ्यापैकी साम्य असणारी पण काही बदलांमुळे ती classic 350 पेक्षा वेगळी ठरते. गोअन क्लासिक 350 बॉबर चार वेगवेगळ्या फॅन्सी कलरमधे लॉन्च करण्यात आली आहे. ज्यांना ट्रीप टील, पर्पल हेज, शॅक रॅक आणि रेव्ह रेड अशी नावे देण्यात आली आहेत. हे सर्व कलर अतिशय आकर्षक आणि स्टायलिश दिसत आहेत. गोअन क्लासिक 350 बॉबर चे टायर पांढरे पट्टी सोबत देण्यात आले आहेत ज्यामुळे बाइकचा वेगळेपणा दिसून येतो. इंटरनॅशनल मार्केटमध्ये बॉबर कॅटेगरीतील गाड्यांना विशेष महत्त्व आणि डिमांड आहे.

गोअन क्लासिक 350 बॉबर ही बाईक बॉबर पद्धतीचा लूक आवडणाऱ्या चाहत्यांसाठी डिझाईन केलेली मोटारसायल आहे. तिचे यू आकाराचे वैशिषटयपूर्ण हॅण्डल बार, मागील फेंडर चे आधुनिक डिझाईन, tubeless वायर स्पोक व्हीलमुले ती इतर बाईक पेक्षा वेगळा लूक देतात. बॉबर बाईकला लाँग ड्राईव्हसाठी प्राधान्य दिले जाते. तसेच ती शहरी भागात सुधा cool personality शो करण्यासाठी वापरली जाते.

इंजिन आणि पॉवर परफॉर्मन्स

Royal Enfield| रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक ३५० बॉबर मार्केट मध्ये दाखल.

गोअन क्लासिक 350 बॉबर ही j-series 349cc, सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन सोबत येते. ज्यात 20 बीएचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क निर्माण करते. या इंजिनला 5 स्पीड गियर बॉक्स सिस्टम आहे. जे आरामदायक आणि स्मूथ रायडिंगचा अनुभव देतात.

फिचर आणि ब्रेकिंग सिस्टम

Royal Enfield| रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक ३५० बॉबर मार्केट मध्ये दाखल.

गोअन क्लासिक 350 बॉबर मधे LED लाईट, ट्रिपर नेवीगेशन सिस्टीम, गियर पोझिशन इंडिकेटर, ऍडजेस्टेबल लिव्हर्स आणि ड्युअल चॅनेल ABS सिस्टम दिले आहे. ज्यामुळे बाईक सुरक्षित आणि आरामदायक रायडिंगचा अनुभव देते.

सीट आणि कंफर्ट

Royal Enfield| रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक ३५० बॉबर मार्केट मध्ये दाखल.

ही बाईक सिंगल सीट डिझाईन सोबत येते. परंतु यात डबल सीट ऑप्शन देखील देण्यात आले आहे. सीट ऍडजेस्टेबल असल्यामुळे ते सिंगल किंवा डबल करता येते.

‘रॉयल एनफिल्ड सिर्फ बाईक नाही, रॉयल्टी का एहसास है’

लॉन्चिंग डेट आणि किंमत

गोअन क्लासिक 350 बॉबर ची किंमत दोन लखपासून पुढे असण्याची शक्यता आहे. आणि ती 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे.

बॉबर बाइक्स अवडणारांसाठी ही एक माफक किमतीमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स बाईक आहे. जी बेटर लूक सोबत लांबच्या प्रवासाला आणि शहरी वापरासाठी देखील उत्तम आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) अधिकृत डिलरकडे भेट द्या. कीवा अधिकृत वेबसाईट ल संपर्क साधा.

Royal Enfield| रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक ३५० बॉबर मार्केट मध्ये दाखल.

.


हे वाचले का..?

US election: डोनाल्ड ट्रम्प यांनी केली विजयाची घोषणा | Donald Trump yani keli vijayachi ghoshna

सोनं (gold) खरेदी करताना काय काळजी घ्याल…? | Sone kharedi kartana kay kalgi ghyal…?

बॉलिवूड अभिनेत्री नुश्रत भरुच्चा ची केदारनाथ भक्ती | bollywood abhinetri  Nushrratt bharuccha chi kedarnath bhakti.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top