आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुणे सातारा मार्गावर पोलिसांनी ५ कोटी रुपयाची रोख रक्कम जप्त केली आहे. हि रक्कम एका वाहनातून सापडली आहे, ज्याचे संबंध शहाजी बापु पाटील यांच्याशी जोडले जात आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आरोप प्रत्यारोपंच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
आचारसंहिता काळात पोलिसांना एका तपासणी दरम्यान वाहनांची झडती घेत असताना Toyota Innova Crysta सांगोला पासिंग या वाहनातून ५ कोटींची रोख रक्कम सापडली. यासोबत वाहनामध्ये चार व्यक्ती असल्यायचे पोलिसांकडून सांगण्यात आले.वाहन मालक आणि वाहनात सापडलेले व्यक्ती हे सांगोल्याचे रहिवासी असून सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे निकटवर्ती असल्याचे चौकशीत आढळले आहे. त्यापैकी एक हा आमदार शहाजी बापू पाटील यांचा पुतण्या असल्याचे, आणि दुसरा हा त्यांचा PA असल्याची बातमी येत आहे.या रोख रकमे बाबत पोलिसांची चौकशी चालू आहे. यामुळे विरोधकांनी या पैशाचा वापर निवडणुकीत मतदार खरेदीसाठी केला जाणार असल्याचा आरोप केला आहे.
राजकीय आरोप
शिवसेना नेते (ubt) संजय राऊत सोशल मीडयाद्वारे या घटनेवर प्रतिक्रिया देत शहाजी बापू यांच्यावर थेट आरोप केले आहेत.त्याच्या मते ही रक्कम मतदाराला आकर्षित करण्या साठी वापरण्यात येणार होती. यावर शहाजी बापू पाटील यांनी तीव्र विरोध करून हा आया विरोधातला कट असल्याचा दावा केला आहे.
शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया
आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपली बाजू स्पष्ट करताना सर्व आरोप फेटाळले आहेत, त्यांनी हा कट असून विरोधकांना दोष दिला आहे. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, निवडणूकी पूर्वी माझी प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न आहे असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
कायदेशीर कारवाई
पोलिसांनी रोख रक्कम जप्त केली असून, सध्या तपास सुरू आहे. संबंधितावर कड्क कारवाई करनार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगीतले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ही घटना राजकीय वर्तुळात मोठा मुद्दा बनली आहे. विरोधकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे शहाजी बापू पाटील यांनी स्वतःला प्रामाणिक आणि निर्दोष सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
या प्रकरणाचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर दिसून येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचले का..?
सोनं (gold) खरेदी करताना काय काळजी घ्याल…?
.
.
.