“स्वतःच्या हक्काचं, कष्टाने उभा केलेलं घर असावं” असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर बांधणे म्हणजे फक्त चार भिंती उभ्या करणे न्हवे, तर ते सुरक्षित, भक्कम, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असावे, याची काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय घराचे वातावरण आनंदी आणि आरामदायक कसे होईल याकडेही लक्ष द्यावे लागते. योग्य नियोजन आणि दर्जेदार साहित्याचा वापर करून घर बांधणे ही एक मोठी गुंतवणूक आहे, आणि ती नीट विचारपूर्वक करणे गरजेचे आहे. या लेखात आपण Ghar bandhkam करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्द्ल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जमिनीची योग्य निवड
घर बांधताना योग्य जागेची निवड करणे महत्वाचे आहे. त्यामध्ये अनेक बाबींचा अभ्यास करून निर्णय घेणे गरजेचे असते, कारण यावरच घराची सुरक्षितता, टिकाऊपणा, आणि सोई सुविधां अवलंबून असतात. त्यासाठी लागणारे काही महत्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत.
घरासाठी जागा, स्थान / Location कसे निवडावे..?
जमिनीचे स्थान तुमच्या गरजेनुसार निवडा.
- शहरापासून जवळ आणि वाहतुकीची सुविधा असेल याची खात्री करा.
- मुले लहान असतील तर चांगली शाळा जवळ असेल याची खात्री करा.
- चांगले कॉलेज जवळ असेल याची खात्री करा.
- बाजारपेठ जवळ असेल याची माहिती घ्या.
- शासकीय सुविधा, कार्यालयं जवळ असतील याची खात्री करा.
- घरात वयस्कर मंडळी असतील तर हॉस्पिटल जवळ असतील याची काळजी घ्या.
- भाजी मंडई, दुकाने, दळण जवळ असतील याची खात्री करा.
- घराजवळ चांगली लोकवस्ती, शेजारील परिसर सुरक्षित आणि निरुपद्रवी असेल याची खात्री करून घ्या.
- पाण्याची सुविधा, वीज सुविधा ऊपलब्ध आहे का ते पहा.
जमिनीचा, मातीचा प्रकार कसा तपासावा..?
- काळी माती, रेतियुक्त माती टिकाऊपणा साठी चांगली मानली जाते.
- खडकाळ जमीन पायाभरणी साठी आणि भक्कम पानासाठी योग्य असते.
- भुसभुशीत जमिनीला खडकाळ भर घालून पाया उभारणी करावी लागते.
- जमिनीत पाणी साठणे किव्वा झिरपन्याची क्षमता असायला हवी.
- जमीन सपाट असल्यास बांधकाम सोपे व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
- उतार असलेल्या जमिनीवर बांधकाम करताना अधिक खर्च होतो.
- वास्तुशास्त्रानुसार जमिनीची दिशा आणि स्वरूप तपासा. उत्तर किंवा पूर्वाभिमुख जमीन वास्तूसाठी चांगली मानली जाते.
- शांतता आणि सोयी सुविधा असलेल्या परिसरात जमीन खरेदी फायदेशीर ठरते.
- जमिनीची सध्याची किंमत आणि भविष्यातील किमतीची वाढ तपासून पहा. भविष्यात जमिन विकल्यास चांगला मोबदला मिळेल अशी जमीन खरेदी करा.
जमिनीचे कागदपत्रे, परवाने आणि मंजुरी कशी तपासावी..?
- जमिनीवर कोणतेही वाद नाहीत याची खात्री करा.
- जमीन NA ( Non Agricultural )आहे का तपासून घ्या.
- ७/१२ उतरा तपासून घ्या.
- फेरफार नोंद तपासून घ्या.
- जमीन मालकीचे हक्क स्पष्ट असलेले असे संबंधातील सर्व कागदपत्रे तपासा.
- स्थानिक नगरपालिका किव्वा ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाना घ्या.
- बांधकामाचा नकाशा मंजूर करून घ्या.
- पर्यावरण आणि झोनल नियमांचे पालन करा.
“संपूर्ण जगाची भटकंती केली तरी, घराचं समाधान कुठे मिळत नाही.”
घर बांधकामासाठी आर्थिक नियोजन कसे करावे..?
- प्रोजेक्ट बजेट तयार करा.
- संपूर्ण बांधकामासाठी लागणाऱ्या गोष्टींचा विचार करून अंदाजपत्रक तयार करा.
- जर आर्थिक नियोजन पूर्ण होत नसेल तर बँकेची मदत घ्या, गृहनिर्माण कर्जाची मदत घ्या.
- बँकांचे व्याजदर तुलना करून पहा.
- प्रधानमंत्री आवास योजना अश्या काही सरकारी योजना मिळूशकत असतील तर योजनेचा लाभ घ्या.
घर बांधताना डिझाईन आणि प्लॅनिंग कशे करावे…?
- घराचे डिझाईन तयार करताना तुमच्या कुटुंबाच्या गरजांना आधी प्राधान्य द्या.
- काही लोक घराच्या रचनेत वास्तुशास्त्राचे पालन करतात, त्यासाठी वास्तुविशारद तज्ञ मंडळी यांच्याकडूनच सल्ला घ्या.
- बजेटच्या मर्यादा निश्चित करा.
- उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर कसा करता येईल याचा विचार करा.
- घरात नैसर्गिक प्रकाश आणि हवेशीर वातावरण राहील अशी खोल्यांची दिशा, दरवाजे आणि खिडकी याची व्यवस्था करा.
- व्हेंटिलेशनची सुविधा करा.
- रोजच्या वापरामध्ये न येणाऱ्या सामानासाठी खोली करा.
- भविष्यात कुटुंबात येणारे नवे सदस्य किंवा वृद्ध व्यक्तींच्या गरजा लक्षात घ्या.
- डिझाईन तयार करताना आर्किटेक्ट आणि सिविल इंजिनियर यांचा सल्ला घ्या.
- त्यांच्याकडून 3D इफेक्ट मध्ये डिझाईन बनवून घ्या, जेणे करून तुम्हाला ते बांधकाम झाल्यावर कसे दिसेल याचा अंदाज येईल.
- सुरक्षा संदर्भातील नियमांचे पालन करा.
घर बांधकामासाठी पानी आणि वीज नियोजन कसे करावे..?
- बांधकाम सुरू करण्याआधी पाणी आणि विजेचे नियोजन करा.
- शक्य असल्यास बोरिंग च्या पाण्याची सोय करा, जेणेकरून बांधकामाला पुरेपूर पाणी उपलब्ध होईल.
- छतावर साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम लाऊन वापर करा. किंवा बोरिंगच्या बाजूला खड्डा करून त्यामध्ये थोडे खडक टाकून त्यामधे पाणी मुरेल अशी व्यवस्था करा.
- विजेसाठी सौर ऊर्जा पॅनल चा वापर करू शकता.
- ड्रेनेज पाईप लाईन जिथे जिथे वळतात तिथं मॅनहोल तयार करा. मॅनहोलची सफाई किंवा दुरुस्ती सोपी असते.
- फायबर किंवा काँक्रीट झाकणं वापरा.
- ड्रेनेजचे पाणी योग्यरित्या वाहून जाण्यासाठी पाईपलाईन मध्ये गरजेनुसार उतार ठेवा.
- PVC किंवा HDPE पाईप वापरा जे गांजनार नाहीत आणि दीर्घकाळ टिकतील.
घर बांधकामासाठी साहित्य खरेदी करताना काय काळजी घ्यावी..?
घर बांधकाम करताना साहित्य टिकाऊ आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे, कारण दर्जेदार साहित्य वापरल्यामुळे घर टिकाऊ आणि मजबूत होते. म्हणुन घर बांधताना साहित्याची निवड आणि खरेदी अत्यंत महत्त्वाचे असते.
- आर्किटेक किंवा सिव्हिल इंजिनीयर च्या सल्ल्यानुसार साहित्याचे प्रमाण ठरवा.
- ISI मार्क असलेले आणि चांगल्या ब्रँडचे सिमेंट वापरा.
- स्वच्छ आणि मध्यम ग्रेड ची वाळू वापरा.
- TMT बार किंवा उच्च प्रतीचे स्टील वापरा जे बांधकामाला टाकत देते.
- सिमेंट ब्लॉक किंवा उच्च प्रतीच्या भाजलेल्या विटा वापरा.
- स्थानिक साहित्य स्वस्त असले तरी त्याचा टिकाऊपणा कमी असतो. त्यामुळे प्रसिद्ध ब्रँड साहित्य खरेदी करा ज्याला ISI किव्वा ISO सर्टिफिकेशन आहे.
- विविध विक्रेत्यांकडून किमतीची तुलना करा.
- शक्यतो मुख्य पुरवठादाराकडून खरेदी करा. दलालांकडून खरेदी केल्यास मध्यस्थी शुल्क भरावे लागते त्यामुळे खर्च वाढतो.
- साहित्याच्या साठवणुकीसाठी योग्य जागा तयार ठेवा.
- प्लंबिंग साठी पाईप आणि फिटिंग दर्जेदार निवडा जेणेकरून पुढे जाऊन लगेच पाण्याची गळती होणार नाही.
- इलेक्ट्रिकल वायरिंग साठी फायर रजिस्टंट वायर वापरा.
- साहित्यासोबत वॉरंटी किंवा हमी मिळते का ते तपासा.
- खरेदीनंतर बिल नक्की घ्या.
घराचे बांधकाम कसे असावे…?
- साधारणता जमिनीचा प्रकार ओळखून पाया खोदला जातो, 4 ते 5 फुटापर्यंत पाया खोदणे आवश्यक आहे.
- पाया मजबूत करण्यासाठी M२० किंवा M२५ ग्रेड काँक्रीट वापरा.
- पायासाठी TMT स्टील बार वापरून फ्रेम तयार करा.
- पक्या भाजलेल्या विटा किंवा ACC ब्लॉकचा वापर करा, ACC ब्लॉक हलके टिकाऊ आणि उष्णता रोखणारे असतात.
- भिंतीची जाडी बाहेरील भिंतीसाठी 9 इंच आणि आतील भिंतिसाठी 4.5 इंच असावी.
- प्रत्येक दहा-बारा फुट अंतरावर कॉलम ठेवा, आणि तो भिंतींनी व्यवस्थित जोडून घ्या.
- भिंतींना दोन्हीकडून प्लास्टर करा.
- स्लॅब ची जाडी कमीत कमी 6 इंच ठेवा, आणि त्यामध्ये TMT बार्स वापरा.
- RCC स्लॅब वापरणे अधिक सुरक्षित आणि टिकाऊ असते. स्लॅब वॉटरप्रूफिंग करणे गरजेचे असते जेणेकरून पाणी गळती होणार नाही.
- प्रत्येक खोलीत किमान दोन खिडक्या ठेवा.
- प्रत्येक मजल्याची उंची किमान 10 ते 12 फूट असावी.
- शॉकप्रूफ वायरिंग कारा आणि उच्च दर्जाचे इलेक्ट्रिकल फिटींग निवडा.
- भूकंपरोधक बांधकामासाठी उपाययोजना करा.
- लिव्हिंग रूम आणि बेडरूम मध्ये विट्रीफायड आणि सिरॅमिक टाईल्स वापरा, आणि बाथरुम साठी अँटी स्किड स्टाईल्स वापरा.
- प्रत्येक टप्प्यावर तज्ञांचा सल्ला घ्या ज्यामुळे तुमचे घर मजबूत, आणि सुंदर बनेल.
- घर बांधकामाला भरपूर पाणी घाला जेणेकरून बांधकाम अतिशय पक्के आणि दीर्घकाळ टिकेल.
घरबांधकाम करताना परिसरात झाडे कशी लावावीत..?
घराला निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी परिसरात झाडे लावावीत ज्यामुळे घराला थंडावा मिळतो आणि निसर्ग रक्षणासाठी मदत मिळते.
- झाडे उन्हापासून संरक्षण करतात आणि घराचे तापमान 4,5 अंशाने कमी करतात.
- झाडे ऑक्सिजन निर्मिती करतात आणि कार्बन डायऑक्साइड मुक्त शुध्द हवा देतात.
- झाडांमुळे परिसर हवेशीर आणि ताजे राहते आणि साकारआत्मक्ता वाढते.
- घरापासून किमान 8 ते 10 फूट अंतर राखून झाडे लावावीत.
- पाईपलाईन आणि ड्रेनेज सिस्टम पासून झाडे दूर लावा.
- फळझाडे लावताना घरापासून कमीत कमी 12 ते 15 फूट अंतर ठेवा.
- मोठी झाडे लावणे शक्य नसल्यास कुंड्यांमध्ये छोटी झाडे लावावीत.
- घराच्या परिसरात झाडे लावणे ही प्रत्येक व्यक्तीची सामाजिक पर्यावरणीय जवाबदारी आहे, झाडांचे संवर्धन आणि संरक्षण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
हे वाचले का…?
- Ghar bandhkam | घर बांधताना कोणत्या गोष्टींची काळजी काळजी घ्यावी..?
- Royal Enfield| रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक ३५० बॉबर मार्केट मध्ये दाखल.
- US election: डोनाल्ड ट्रम्प यांनी केली विजयाची घोषणा | Donald Trump yani keli vijayachi ghoshna
- बॉलिवूड अभिनेत्री नुश्रत भरुच्चा ची केदारनाथ भक्ती | bollywood abhinetri Nushrratt bharuccha chi kedarnath bhakti.
- फटाके घेऊन जाताना झाला स्फोट एकाचा मृत्यू , पाचजण जखमी | Diwali phatake gheun jatana zala blast 1 mrityu, 6 jakhmi