फटाके घेऊन जाताना झाला स्फोट एकाचा मृत्यू , पाचजण जखमी | Diwali phatake gheun jatana zala blast 1 mrityu, 6 jakhmi

दिवाळी Diwali साजरी करण्यासाठी फटाक्याची पिशवी टू व्हीलरवरून घेऊन जात असताना अचानक झाला स्फोट एकाचा जागीच मृत्यू  झाला असून आणखी सहाजन गंभीर जखमी झाले आहेत.

फटाके घेऊन जाताना झाला स्फोट एकाचा मृत्यू , पाचजण जखमी | Diwali phatake gheun jatana zala blast 1 mrityu, 6 jakhmi

काल दिनांक 31 ऑक्टोंबर 2024 रोजी दिवाळी साजरी करण्यासाठी फटाक्याने भरलेली पिशवी घेऊन जात असताना गाडी मालकाचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला आहे, आणि सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

हे वाचलं का ..?  सोनं (gold) खरेदी करताना काय काळजी घ्याल…? | Sone kharedi kartana kay kalgi ghyal…?

घटना आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यात गोवरंमा टेंपल येथे Honda Activa गाडीवरून तीन लोक हॅन्डमेड फटाके घेऊन जात असताना घडली आहे.  गाडीवरून जात असताना अचानक फटाक्यांचा मोठा ब्लास्ट होऊन गाडीला आग लागली.

ब्लास्ट एवढा मोठा होता की गाडि जागेवर जळून खाक झाली आणि गाडीवर असणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आणि बाकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सोबत रोडच्या बाजूला उभा असलेले चार व्यक्ती सुध्धा या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. एकुण 6 लोक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन जखमी लोकांना सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

हे वाचलं का ..?  नवी मुंबईत दिवाळीच्या लायटिंग वरून 2 गटात हाणामारी, केस दाखल | Navi Mumbait Diwali lighting varun 2 gatat vaad, case dakhal

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top