आज दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी सर्वत्र दिवाळी आनंदानी साजरी होत असताना नवी मुंबईत (Navi Mumbai) येथील एका सोसायटी मध्ये उत्सवाला गालबोट लागले आहे.
सध्या सोशल मीडिया मध्ये एक व्हिडिओ भरपूर वायरल होत आहे, ज्यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. हा वाद सोसायटीमध्ये दिवाळीनिमित्त केलेल्या लायटिंगला विरोध केल्यामुळे झाला आहे.
महाराष्ट्र नवी मुंबई येथील तळोजा येथे एका सोसायटीतील चेअरमन आणि काही रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर दिवाळीनिमित्त सजावट केलेल्या लोकांना धमकावल्याचा आणि महिलेचा अपमान केल्याचा, तसेच शांतता भंग करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
सोनं (gold) खरेदी करताना काय काळजी घ्याल…? | Sone kharedi kartana kay kalgi ghyal…?
घटना मंगळवारी 30 ऑक्टोबर 2024 रोजी घडली आहे. सोसायटी मधील काही लोकांनी दिवाळी सणानिमित्त उत्सव साजरा करण्याकरता सजावट आणि विद्युत रोषणाई केली. त्यावर सोसायटीतील चेअरमन आणि इतर साथीदारांनी यावर आक्षेप घेऊन सजावट काढून टाकण्यास सांगितले. आणि सजावट न काढल्यास गंभीर परिणाम होतील असे धमकावले त्यासोबतच महिलांसोबत वाद घालून दमदाटि केली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावर संस्थेचा चेअरमन आणि इतर संबंधित लोकांना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काय होता सोसायटी चा नियम..? दोन्ही बाजूची चौकशी पोलीस करत आहेत.
यावर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
.
हे वाचले का..?
Prakash Ambedkar hospital madhe bharti | प्रकाश आंबेडकर हॉस्पिटल मधे भरती