प्रकाश आंबेडकर हॉस्पिटल मधे भरती | Prakash Ambedkar hospital madhe bharti

प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांना छातीत दुखून अस्वस्थता वाटत असल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Prakash Ambedkar hospital madhe bharti | प्रकाश आंबेडकर हॉस्पिटल मधे भरती
Prakash Ambedkar hospital madhe bharti | प्रकाश आंबेडकर हॉस्पिटल मधे भरती

विधानसभेच्या धावपळीत प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने पुण्यात हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची ताब्यात ठीक असल्याचे सांगीतले जात आहे.

त्यांना अँजिओग्राफी करून चाचणी केली असून त्यात एक ब्लॉकेज असल्याचे निदान झाले आहे.याधी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना एनजीओप्लास्टि केलेली आहे. सध्या त्यांचे वय 70 वर्ष आहे.

कार्यकर्ते आणि आंबेडकरी समाजामध्ये चिंतेचे वातावरण आहे

कार्यकर्ते आणि आंबेडकरी समाजामध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हॉस्पिटलच्या आवारात जमा झाले आहेत.

सुजात आंबेडकर

बाळासाहेब आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना शांत आणि आपापल्या घरी राहण्यासाठी आव्हान केले आहे. हॉस्पिटलच्या आवारामध्ये गर्दी करू नये याची काळजी घ्यायला सांगितली आहे. बाळासाहेबांना पहाटे छातीत दुखून अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुण्यातल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रकृती ठीक असून चिंता करण्याची काही गरज नसल्याचे त्यांनी  सांगितले होते.

प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात नसांमध्ये गाठ असल्याचे मुख्य कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयाच्या नसांमध्ये गाठ असल्याचे निदान एन्जिओग्राफीमध्ये झाले आहे. आता हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची खात्री कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया माध्यमानमधून दिली आहे. सध्या प्रकाश आंबेडकर आय सी यु मध्ये ऍडमिट असल्याचे सांगितले आहे.परिस्थिती स्थिर असल्याचे सांगीतले जात आहे.

हे वाचले का…?

सोनं (gold) खरेदी करताना काय काळजी घ्याल…? | Sone kharedi kartana kay kalgi ghyal…?

पुण्यात ५ कोटींची रोख रक्कम जप्त: निवडणुकी पूर्वी वातावरण तापले | Punyat 5 koti rokh rakkam japt

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top