सोनं (gold) खरेदी करताना काय काळजी घ्याल…? | Sone kharedi kartana kay kalgi ghyal…?

भारतीय संस्कृती आणि सोनं (gold)

भारतीय संस्कृतीत सोनं (gold) हे केवळ एक मौल्यवान धातू नसून ते एक भावनिक, आर्थिक परंपरेचा भाग आहे. अन्य कोणत्याही देशापेक्षा भारतीय मनात सोण्याला विशेष महत्त्व आहे. जगाच्या तुलनेत ११% सोनं हे फक्त भारतात आहे. भारतामध्ये सोन्याला अलंकार आणि दर्जेदार राहणीमानासोबत जोडले जाते. विवाह समारंभ, सन आणि अन्य विशेष शुभ प्रसंगात सोनं खरेदी करणं महत्वाचं मानलं जातं. सोनं दीर्घकालीन टिकाऊ असल्यामुळे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा म्हणून दिले जाते, काळानुरूप सोन्याची किंमत वाढत जाते ज्याचा उपयोग संकट काळात होऊ शकतो त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते.

gold jewellery
gold jewellery

सोने खरेदी आणि इन्व्हेस्टमेंट चे प्रकार

मार्केटमध्ये सध्या सोने खरेदीचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत, त्यात काही पारंपरिक आणि काही नवीन पद्धती आहेत. सोने खरेदीतून योग्य रिटर्न मिळवण्यासाठी आपण काही पद्धती पाहूयात.

गोल्ड ज्वेलरी (Jewellery) पद्धत सर्वाधिक लोकप्रिय पद्धत आहे. याचे काही फायदे आणि सोबत नुकसान देखील आहेत. ज्वेलरी आपण अलंकार म्हणून वापर करू शकतो, पण जेव्हा आपण ज्वेलरी खरेदी करतो तेव्हा 10 % पर्यंत मेकिंग चार्जेस देखील लागतात द्यावे लागतात आणि सोबत 3% GST charges देखील भरावे लागतात. ज्वेलरी सफे ठेवणे देखील जोखमीचे काम आहे.

फिजिकल गोल्ड (gold) हा दुसरा कॉमनली वापरला जाणारा प्रकार आहे. यात सोन्याचे शिक्के (gold coin) आणि सोन्याची बस्किटे (gold bar) विकत घेता येतात. यासाठी मेकिंग चार्जेस लागत नाहीत, आणि शुद्धतेची गॅरंटी असते. प्रत्येक शिक्यावर आणि बिस्कीटावर भारतीय मानक ब्युरोचा (BIS) हॉलमार्क असतो. फिजिकल गोल्ड ज्वेलर, बँक, आणि ई कॉमर्स वेबसाईट वरून खरेदी करू शकतो. फिजिकल गोल्डसाठी सुद्धा 3% GST द्यावी लागते, आणि घरामध्ये ठेवलं तर सुरक्षेचा मुद्दा देखील येतो.

डिजिटल गोल्ड यामध्ये आपण ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारा गोल्ड खरेदी करू शकतो, बऱ्याचशा पेमेंटॲप मधून आपल्याला गोल्ड खरेदीचे ऑप्शन उपलब्ध आहेत. यात सर्वात मोठा फायदा हा आहे की आपल्याला यासाठी मोठ्या रकमेची गरज नाही. आपण कमीत कमी रकमेतून म्हणजेच 50-100 रुपये पासून सुद्धा आपण गोल्ड खरेदीची सुरुवात करू शकतो. आपण छोट्या प्रमाणात खरेदी आणि विक्री पण करू शकतो हा याचा सर्वात मोठा बेनिफिट आहे. यात सुद्धा 3% जीएसटी भरावा लागतो. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्युरिटीची गॅरंटी असते, आणि चोरी होण्याचं टेन्शनही राहत नाही. आणि कोणतेही स्टोरेजचे चार्जेस सुद्धा लागत नाहीत.

सॉवरेन गोल्ड बाँड हे गव्हरमेंट कडून अधून मधून उपलब्ध केले जातात. त्यासाठी वर्षातून एक किंवा दोन वेळा सरकारी प्लॅटफॉर्म उभा केले जातात. यात सरकारी गॅरंटी असते, पैसा बुडण्याची जोखीम नसते. यामध्ये सोन्याचे भाव वाढण्याचे फायदे सुद्धा आपल्याला मिळतात आणि त्याचं व्याज सुद्धा मिळतं. यासाठी तुम्ही सरकारी बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा अधिकृत ब्रोकर कडून तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडची खरेदी करू शकता.

गोल्ड इ टी एफ (exchange traded fund) हा एक प्रकारचा ओपन एडेड म्युचल फंड आहे. यामध्ये प्रत्यक्षपणे सोने खरेदी करन्याऐवजी गुंतवणूकदार ETF युनिट खरेदी आणि विक्री करतात. हे फंड कंपन्यांच्या शेअर सारख स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड असतात आणि त्याची ट्रेडिंग सुद्धा करता येते. लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी याचा फायदा होतो,आपण याची कधीही खरेदी आणि विक्री करू शकतो आणि फिजिकल गोल्ड प्रमाणे याची चोरी होण्याची भीती नसते.

गोल्ड सेविंग प्लान आजकाल बऱ्यापैकी मोठे ज्वेलर्स गोल्ड सेविंग प्लॅन ऑफर करत आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याला एक फिक्स रक्कम त्यांच्याकडे जमा करावी लागते. यावर आपल्याला बोनस सुद्धा मिळतात. जमा झालेल्या एकुण रकमेवर बोनस ऍड करून आपण त्या ज्वेलर कडून ज्वेलरी खरेदी करू शकतो. यातून आपण थोड्या थोड्या रकमेतून जमा झालेल्या पैशांमधून सोने खरेदी करू शकतो.

gold bar
gold bar

सोने खरेदी करताना घ्यावयाची काळजी

सोने खरेदी करताना आपण काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. जेणेकरून आपल्याला त्याचा योग्य मोबदला मिळेल.

हॉलमार्क प्रमाणपत्र BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड प्रमाणित हॉलमार्क असलेलेच सोने खरेदी करावे. यामुळे सोन्याची शुद्धता सूनिश्चित होते.

कॅरेट शुद्धता सोन्याची शुद्धता ही वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध असते जसे की 24 कॅरेट, 22 कॅरेट, आणि 18 कॅरेट. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुध्द पण अतिशय मऊ स्वरूपात असते, त्याला आकार देणे किंवा बारीक नक्षी तयार करण्यास ते कठीण असते. त्यामुळे जास्त करून 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो, ज्यामध्ये काही प्रमाणात मिश्र धातू असतात पण त्यामुळे ते अधिक टिकाऊ आणि दागिन्यांच्या निर्मितीसाठी योग्य ठरते.

मेकिंग चार्जेस दागिन्यावरील मेकिंग चार्जेस प्रत्येक ज्वेलर्स कडे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. त्याची शहनिशा करावी आणि इतर ठिकाणी कम्पेअर करून पहावे.

ज्वेलरी दुकानदाराची विश्वसनीयता विश्वसनीय व प्रसिद्ध सोने दुकानदारांकडूनच ज्वेलरी खरेदी करावी आणि खरेदीनंतरही ते स्वतःचे सोने परत खरेदी करतात का आणि चांगली किंमत देतात का माहिती घ्या.

बिल सोने खरेदीवर अधिकृत बिल घ्या. ज्यामध्ये सोने कॅरेट वजन किंमत आणि मेकिंग चार्जेस याचा स्पष्ट उल्लेख असावा.
गुंतवणुकीचा उद्देश जर गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने खरेदी करत असाल तर सोने हे नाणी किंवा बार (gold bar) स्वरूपात घेतलेले उत्तम, कारण यावर मेकिंग चार्जेस लागत नाहीत.

 

हे वाचले का..?

पुण्यात ५ कोटींची रोख रक्कम जप्त: निवडणुकी पूर्वी वातावरण तापले

.

.

.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top